जवळपास २००० फूटा हून जास्त उंच

Pratik Rajendra Kshirsagar 23.02.2018 16:21

जवळपास २००० फूटा हून जास्त उंच पठारावर रसाळगड पसरलेला असून तिथून सरळ सुमारगड व महिपतगड हे त्रिकूट सह्याद्रीत भक्कमपणे उभे आहेत. फारसा इतिहास प्रचलित नाही पण भौगोलिकदृष्ट्या हे तिन्ही गड महत्वाचे. गडापर्यंत पोहचायला रस्त्याची सोय असून फार चढण नाही. पण रांगेत भटकंती करत सुमार व महिपत करायचा असेल तर बरेच चढ-उतार व दाट जंगलातून जावं लागतं. गडवार ५ ते ६ लहान-मोठ्या पोर्तुगीज बनावटीच्या तोफा, ४ पाण्याच्या टाक्या आहेत तसेच झोलाई व वाघजाई देवीचे मंदिर चांगल्या स्थितीत आहे. फोटोमध्ये दिसणारा दगड ह्याला 'विरगळ' असे म्हणतात जो की धारातिर्थ पडलेल्या योद्धांचे स्मरण करुन देतो. #sahyadri_clickers #ig_maharashtradesha #maharashtra_uncensored #miekdurg #maharashtra_desha #maharashtra_clickers #insta_maharashtra #majha_mh #forts_treasure #gadkille #we_maharashtrian #forts_of_maharashtra #bhatkanti #raigad_ig #durg_naad #durg_maratha

Rasalgad, Khed

73 Likes
1 Comments